Artillery Shells | Pavangad fort Kolhapur District

 माती आड दडलेला शिवकालीन खजीना



पावनगडावर 4/2/2021 रोजी मोठ्या प्रमाणात दगडी तोफगोळे सापडले. हे तोफगोळे शिवकालीन असुन आकाराने लहान मोठे आहेत. या ठिकाणी सापडलेले 406 तोफगोळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिले आहेत.

किल्ले पावनगडावर टिम पावनगड या संस्थेकडून गेल्या दिड दोन वर्षापासुन दुर्गसंवर्धनाच काम सुरू आहे. या गडावर  दिशादर्शक फलक लावण्याचे काम गेल्या आठ दिवसापासुन सुरू आहे. हे काम करणाऱ्या अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी, मारुती पाटील,सार्थक भोसले आदी दुर्गवीरांच्या संपर्कात सातत्याने होते.  

4/2/2021 रोजी पावनगडावर जावून उर्वरीत चार बोर्ड लावण्याचे ठरले होते, यासाठी सुखदेव गिरी, राम यादव  अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी आणि सार्थक भोसले गडावर पोहचलो होतो. तुपाची विहिर आणि अन्य दोन ठिकाणचे बोर्ड लावून झाल्यानंतर मुख्य मंदीरासमोरील बोर्ड लावण्यासाठी केवळ पाच सहा इंच खोदकाम केले असता  त्या ठिकाणी दगडी तोफगोळे असल्याचे आढळून आले. एकास एक लागुन जमिनीत दडलेला तोफगोळ्याचा खजिना दुर्ग संवर्धनाच्या निमित्याने उजेडात आला. केवळ दोन x दोन फुटाच्या खोलीत शेकडो तोफगोळे आढळून आले. पावनगड हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे या गडावर शेकडो वर्षापासुन मातीआड लपलेला अनमोल खजीना बघून आम्हाला अत्यांनंद झाला.

पावनगडावर तोफगोळे सापडल्याची माहीती सुखदेव गिरी यांनी तत्काळ  मार्गदर्शक आणि दुर्गसंवर्धन चळवळीचे प्रणेते खा.संभाजीराजे छत्रपती यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वनविभागाच्या अधिकारी प्रियांका दळवी आणि भारतीय पुरातत्व विभागाचे विजय चव्हाण यांना दिली. या ठिकाणी मातीआड असलेल्या तोफ गोळयांची संख्या वाढतच चालल्याने वन आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्खननाचे काम थांबवले आणि मिळालेले 406 तोफगोळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिले.

वनविभागाच्या ताब्यात असलेल्या या पावनगडावर पुरातत्व विभागाच्या वतीने शास्त्रोक्त पध्दतीने उत्खनन व्हावे आणि मातीआड दडलेला खजीना उजेडात आणावा यासाठी आत्ता समस्थ दुर्गवीर संस्थांच्या वतीने प्रयत्न करायचे आहेत. कोणत्याही अपेक्षे शिवाय गडकोट संवर्धन हेच शिवकार्य म्हणून कार्य करणाऱ्या टिम पावनगडचे अभिनंदन.


Comments

Popular posts from this blog

Conservation in Action: Kolhapur's 'Poaching-Free' Campaign Protects Western Ghats Wildlife.

72nd Republic Day 2021 | Vishwa Associates, Kolhapur