Artillery Shells | Pavangad fort Kolhapur District
माती आड दडलेला शिवकालीन खजीना पावनगडावर 4/2/2021 रोजी मोठ्या प्रमाणात दगडी तोफगोळे सापडले. हे तोफगोळे शिवकालीन असुन आकाराने लहान मोठे आहेत. या ठिकाणी सापडलेले 406 तोफगोळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिले आहेत. किल्ले पावनगडावर टिम पावनगड या संस्थेकडून गेल्या दिड दोन वर्षापासुन दुर्गसंवर्धनाच काम सुरू आहे. या गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम गेल्या आठ दिवसापासुन सुरू आहे. हे काम करणाऱ्या अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी, मारुती पाटील,सार्थक भोसले आदी दुर्गवीरांच्या संपर्कात सातत्याने होते. 4/2/2021 रोजी पावनगडावर जावून उर्वरीत चार बोर्ड लावण्याचे ठरले होते, यासाठी सुखदेव गिरी , राम यादव अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी आणि सार्थक भोसले गडावर पोहचलो होतो. तुपाची विहिर आणि अन्य दोन ठिकाणचे बोर्ड लावून झाल्यानंतर मुख्य मंदीरासमोरील बोर्ड लावण्यासाठी केवळ पाच सहा इंच खोदकाम केले असता त्या ठिकाणी दगडी तोफगोळे असल्याचे आढळून आले. एकास एक लागुन जमिनीत दडलेला तोफगोळ्याचा खजिना दुर्ग संवर्धनाच्या निमित्याने उजेडात आला. केवळ दोन x दोन फुटाच्या खोलीत शेकडो ...